कृषीतज्ञ प्रवीण माळी राज्यस्तरीय ऊस विकास कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळचे सुपुत्र व कृषीतज्ञ प्रवीण चंद्रकांत माळी यांना महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाकडून राज्यस्तरीय ऊस विकास कार्य गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.गेल्या दहा वर्षापासून कृषीतज्ञ प्रवीण माळी यांनी कमी खर्चात ऊस उत्पादन घेण्याचे प्रयोग करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्त्रोत वाढला आहे. तसेच त्यांनी ऊस विकासासाठी नवनवीन संकल्पना मांडून शेतकऱ्यांना ऊस उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित केले. कृषी क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील पेठ येथील महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाकडून ऊस विकास कार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी जनाई गार्डन पेठ येथे उत्साहात संपन्न झाला. किसान संघ परिसंघ शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या हस्ते कृषीतज्ञ प्रवीण माळी यांना मानाचा फेटा, शाल, व मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष किरणभाऊ चव्हाण, महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष अतुलनाना माने पाटील, सांगली जिल्हा कृषी अधिक्षक विवेक कुंभार, वाळवा इस्लामपूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय बुवा, कृषी उपसंचालक नामदेव परीट, महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे उपाध्यक्ष सचिन पाटील, कृषी उद्योजिका सौ कल्पना प्रवीण माळी यांच्यासह मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!