पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
हातकणंगले तालुक्यातील रामलिंग आळते रोडवर असणाऱ्या ग्रीनवेल कंपनी या पत्रावळ्या तयार करणाऱ्या कंपनीला आग लागून करोडो रुपये नुकसान झाले आहे.यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही यावेळी अग्निशामक च्या दहा गाड्या दाखल घटनास्थळी बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू होते.
हातकणंगले तालुक्यातील रामलिंग आळते रोडवर असणाऱ्या अनिल मालपाणी यांची ग्रीनवेल कंपनी पत्रावळी तयार करण्याचा कारखाना काही वर्षापासून या ठिकाणी आहे या ठिकाणी 700 ते 800 महिला मजूर काम करतात या ठिकाणी पत्रावळी तयार करण्याचे कारखाना मोठ्या प्रमाणात आहे आज साडे अकराच्या सुमारास बॉयलर मध्ये लिकेज होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली या आगीने रौद्ररूप धारण केले होते या ठिकाणी असणाऱ्या कच्चामाला वर प्रक्रिया करून पक्का तयार केला जातो या तयार केलेल्या पत्रावळ्यांना मोठ्या प्रमाणात आग लागली तेथे काही काम करणाऱ्या महिला व पुरुषांना बाहेर जाण्याचे आवाहन केले तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते काही लोकांनी अग्निशामक दलाला फोन केले अग्निशामक गाड्या यांना उशीर झाला कारण की ही ग्रीन वेल कंपनी आळते हळदीत असल्यामुळे गाड्यांना उशीर झाला त्यामुळे अग्नी रौद्ररूप धारण केले कोल्हापूर इचलकरंजी जयसिंगपूर घोडावत शरद साखर कारखाना पंचगंगा या सर्व ठिकाणच्या अग्निशामक च्या गाड्या दाखल झाल्या व आगीवर नियंत्रण मिळण्यास सुरू होते पण आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आगेची लोट चार ते पाच किलोमीटर पर्यंत दिसून येत होते घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती अनिल मालानी ही इचलकरंजीचे रहिवासी असून त्यांनी कंपनी सुरू केली एक शाखा अत्यादी तर दुसरी शाखा हातकणंगले गावात आहे सोमवारी पत्रावळी कारखान्याला आग लागल्यामुळे कोट्यात रुपयाची अनिल मालपाणी याचे मात्र मोठे नुकसान झाले आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीची प्रयत्न अग्निशामक दलाचे कर्मचारी करत होते घटनास्थळी आठ ते दहा अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या तसेच डोळ्यासमोर कंपनी जळत असल्यामुळे महिलांच्या डोळ्यांमध्ये अश्रू अनावर झाले होते आगीवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्याच वेळेला यश आले आहे या आगीमुळे कंपनीचे मात्र मोठे नुकसान झाले या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे