आळते येथे पत्रावळी तयार करणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग

Spread the love

 

हातकणंगले तालुक्यातील आळते रामलिंग रोडवरील पत्रावळी तयार करणाऱ्या फॅक्टरीला आज शनिवार दिनांक 1 मार्च रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली असून परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.घटनास्थळी अग्निशामकच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की आळते येथील रामलिंग रोडवर अनिल मालाणी राहणार इचलकरंजी यांची ग्रीनवेल नावाने पत्रावळ्या तयार करणारी कंपनी आहे.या ठिकाणी जवळपास 700 ते 800 कामगार काम करतात दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक कंपनीला मोठ्या प्रमाणात आग लागली.यामध्ये रौद्ररूप धारण केले आगीचे लोट दोन ते तीन किलोमीटर दिसून येत होते.घटनास्थळी कोल्हापूर,इचलकरंजी, जयसिंगपूर,घोडावत ग्रुप, शरद साखर कारखाना या सर्वांच्या अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.या आगीत कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.अजून आगीवर नियंत्रण ठेवता आले नाही.घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

error: Content is protected !!