पुलाची शिरोली /प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील सर्वेश्वर महादेव मंदिरात ओम नमः शिवाय मंत्राचे नामस्मरण धार्मिक विधी व शिवलीलामृत ग्रंथाचे पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी करण्यात आली.पुलाची शिरोली येथील सर्वेश्वर महादेव मंदिरांमधील शिवलिंग सुमारे चारशे पन्नास वर्षापूर्वीचे असून करवीर महात्म्य मध्ये या शिवलिंगाचा उल्लेख केलेला आहे.अशा पुरातन शिवलिंगास पहाटे पाच वाजता ओम नमः शिवाय ओम नमः शिवायचा गजर करत शिवलिंगास महा रुद्र अभिषेक त्यानंतर ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करण्यात आला यानंतर शिवलीलामृत ग्रंथाचे सामुदायिक पारायण सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत झाले. शिरोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच २०० हुन अधिक महिला व पुरुष यांनी शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करण्यात आले.सर्वेश्वर महादेव मंदिरामध्ये नव्याने लोक वर्गणीतून व शिवभक्तांच्या सहकार्यातून चार किलो चांदीचा मुकुट बनवण्यात आला आहे.यावेळी सर्वेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी स्वरूप महाडिक ,सौ.ग्रीष्मा महाडिक तसेच सरपंच प्रतिनिधी माजी उपसरपंच कृष्णात करपे,उपसरपंच बाजीराव पाटील,ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव,राष्ट्रसेवा युवक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील,उद्योजक जगन्नाथ पाटील,तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील आले होते.सर्वेश्वर महादेव मंदिर प्रमुख उत्तम पाटील महाराज तसेच मधुकर पद्मई व मंदिर व्यवस्थापणाने यांच्या हस्ते ग्रंथ पुजन करण्यात आले.तसेच पारायणास बसलेत्या भाविकांना ग्रंथाचे वाटप या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता शिवलिंगास पुन्हा महाअभिषेक करण्यात येणार आहे.त्यानंतर भजनाचा कार्यक्रम व रात्री बारा वाजता शिवलिंगास उसाच्या रसाचा महाअभिषेक व शुक्रवारी सकाळी प्रसादाचे वाटप असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याचे मंदिर व्यवस्थापक उत्तम पाटील महाराज यांनी आज बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता दिली.
महाशिवरात्री निमित्ताने मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, मंडप वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक सजावटीने सजलेली हे मंदिर सगळ्यांचे लक्ष वेधले. दर्शनासाठी पहाटे पासूनच भाविकांची मोठी गर्दी केली होती.या कार्यक्रमाचे नियोजन सर्वेश्वर महादेव मंदिराचे प्रमुख उत्तम पाटील महाराज व सर्वेश्वर महादेव मंदिर कमिटी शिरोली ग्रामपंचायत गावातील सर्व तरुण मंडळ गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी यांनी केले.