जयसिंगपूर / प्रतिनिधी
येथील जयसिंगपूर – उमळवाड रोडवरील मादनाईक मळयातील चाँदसो इमामसो शेख यांचे मंगळवारी सायंकाळी 6 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले आहे.दैनिक प्रतिध्वनीचे जयसिंगपुर विभागीय प्रतिनिधी पत्रकार हुसेन शेख यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा ,मुलगी ,सुना, नातवंडे असा परिवार आहे.निधना समयी ते 75 वर्षाचे होते.ते एक कष्टकरी कुटुंबातील होते.शेती व्यवसाय करीत होते.ते अत्यंत मनमिळावू व शांत स्वभावाचे व सर्वांच्या परिचयाचे होते.त्यामुळे आसपासच्या परिसरात त्यांना सर्वजन आदराने चाँदभाई म्हणुन प्रेमाने बोलवायचे.त्यांच्या निधनाची बातमी समजताच मित्र परिवार ,सामाजिक ,राजकीय तसेच सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धाजंली वाहिली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.गुरुवारी 27 फेब्रूवारी रोजी सकाळी 10.30 वाजता जयसिंगपुर येथील मुस्लिम समाज कब्रस्तान येथे जियारत विधी होणार आहे.