सर्वेश्वर महादेवांच्या मुखवट्याची मिरवणूक मोठ्या उत्साहात

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुलाची शिरोली येथील सर्वेश्वर मंदिरा मधील महादेवांचा चार किलो चांदीच्या मुखवट्याची महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्या मुखवट्याची सकाळी साडेनऊ वाजता सराटे ज्वेलर्स पासून गावातील मुख्य रस्त्यावरून ढोल, हलगी आणि टाळ मृदंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.

सध्या शिरोलीतील पाटील गल्ली येथील प्राचीन सर्वेश्वर मंदिरातील महादेवाचे चार किलो चांदीचा मुखवठा शिवभक्तांच्या देणगीतून करण्यात आला.सोमवारी या चांदीच्या मुखवट्याचे मोठ्या उत्साहात मिरवणुकीने सकाळी साडेनऊ सुमारास मोठ्या उत्साहात आगमन झाले. त्यासाठी सराटे ज्वेलर्सच्या दुकानातून हा मुखवटा वाजत गाजत आणला .
या मिरवणुकीच्या अग्रभागी ढोल ताशांचा गजर सोबत हलगीचा कडकडाट आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात या मुखवट्याचे आगमन झाले. त्यासाठी शिवभक्त, महिला, वारकरी संप्रदाय, सामाजिक राजकीय मान्यवर सहभागी झाले होते.या मुखवट्याचे आगमन प्रसंगी उत्तम पाटील महाराज ,मधुकर पद्माई,सरपंच प्रतिनिधी कृष्णात करपे , तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, माजी जि प सदस्य महेश चव्हाण,माजी उपसरपंच उदयसिंह पाटील , उद्योजक जगन्नाथ पाटील , शिरोली विकास सेवा सोसायटी चे माजी चेअरमन संजय पाटील, शिरोली हाउसिंग सोसायटी चे अध्यक्ष राजू पाटील, बिरदेव विकास चे उपाध्यक्ष शिवाजी पाटील, योगेश खवरे, अभिजीत पाटील, विजय चौगुले यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!