औरवाड- कवठेगुलंद मार्गावरील गौतम कीनिगे यांचे शेताजवळ चारचाकी कार पलटी होऊन एकजन जागीच ठार झाल्याची घटना आज सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.सौरभ राजू चव्हाण वय वर्षे 25 राहणार आसरानगर असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.या अपघातामध्ये इतर दोघेजण किरकोळ जखमी झालेत. घटनास्थळी मिळालेल्या माहितीवरून इचलकरंजी इथला सौरभ चव्हाण वय 25 याचेसह अन्य दोघेजण औरवाड ते कवठेगुलंद हायस्कूल मार्गावरून चारचाकी क्रमांक
MH 09 FB 6993 गाडीने गणेशवाडीकडे जात होते.सदर चारचाकी गाडी गौतम किनिगे यांच्या शेताजवळ आले असता गाडीचे चाक तूटून गाडी नजीकच्या शेतात जाऊन पलटी मारल्याने सौरभ चव्हाण यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने तो जागीच ठार झालाय.तर अन्य दोघे किरकोळ जखमी झालेत. अपघातस्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.तर कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे.सदर मृतदेह शवविच्छेदनास शिरोळ येथे पाठवले आहे.अधिक तपास रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदवाड पोलीस करीत आहेत.
चारचाकी मधील मयत व अन्य दोघांचा कवठेगुलंद व गणेशवाडीत वावर
कवठेगुलंद येथील अपघातातील चारचाकी गाडी कोणाची,गाडी कोठून आली,कोठे थांबली होती,गाडी गणेशवाडीकडे का जात होती,गाडीतील मयत इचलकरंजी येथील रहिवाशी असल्याने या कवठेगुलद व गणेशवाडी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले तर तपासाला अधिक गती येणार असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.