शिरोली सांगली फाटा येथे वयोवृद्धाची गळफास लावून घेवून आत्महत्या

Spread the love

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे

कोल्हापूर सांगली राज्य मार्गावर सांगली फाटा येथील पारीक मेटल येथे ६८ वर्षीय वयोवृद्धाने गळफास लावून घेवून आत्महत्या केली ही घटना आज सकाळी आठ वाजता उघडकीस आली . ही आत्महत्या दारूच्या नशेत केलाच्या प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.पोलिसातून मिळालेली माहिती कि मयत वयोवृध्दाचे नाव बाबूराव दत्तू जाधव ( रा.सुळकुड ता कागल जि कोल्हापूर ) असून ते दोन दिवसापूर्वी शिरोली येथे पाहूण्यांकडे राहण्यासाठी आले होते त्यांनी मंगळवारी पाहुण्यांना सुळकुड गावी जातो असे सांगुन गेले पण गावी न जाता त्यांनी सांगली फाटा येथील पारीक मेटल भांडी दुका बंद टपरीच्या बाजुला लोखंडी खांबाला प्लॅस्टीक च्या स्टॅगने गळ्यास गळफास लावुन घेवून आत्महत्या केली . त्याना दारूचे व्यसन असल्याने त्या नशेत त्यानी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे .

error: Content is protected !!