शिये / प्रतिनिधी
शिये येथील विठ्ठल नगर मधील १२५ मिळकतधारकांचे वन जमिनीवर अतिक्रमण सिद्ध झाल्यास ते चार आठवड्यांत काढून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.पण अतिक्रमण काढण्यापूर्वी कोल्हापूरच्या उपवन संरक्षक यांनी संबंधित १२५ लोकांची सुनावणी घेऊन कागदपत्रांची पडताळणी करावी,असेही आदेशात न्यायालयाने म्हटले आहे.विठ्ठलनगर नवीन वसाहत येथील वनजमिनीवरील अतिक्रमण केलेल्या १२५ घरांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालय येथे जनहित याचिका दाखल केली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अमोल शिंदे यांनी आज बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता दिली.अतिक्रमणाच्या अनुषंगाने ५ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाने कोल्हापूर उपवनसंरक्षकांना अतिक्रमणधारकांची सुनावणी घेऊन कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश दिले. आवश्यक तो पोलिस बंदोबस्तही पुरवावा, असेही म्हटले आहे.या निकालानंतर शिये परिसरात एकच खळबळ माजले आहे.मात्र या परिसरातील ५७ मिळकतींना सातबारा उतारे देण्यात आले होते.वन विभागाच्या मोजणीनंतर वन हद्दीत येत असल्याचं अनेक वेळा दिसून आला आहे.या परिसरात दगड खन मजूर तसेच एमआयडीसीला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे.जर वन विभागाच्या वतीने कारवाई केली तर यांची पुनर्वसन कशा पद्धतीने करण्यात येणार आहे त्याबाबतची स्पष्ट भूमिका अध्यापित झालेली नाही.