पुलाची शिरोली / कुबेर हंकारे
राजारामपुरी कोल्हापूर येथे डॉ.अमित श्रीनिवास पदमाई व डॉ.ऋतुजा कोरे – पदमाई यांनी नव्याने सुरू केलेल्या श्री साई समर्थ डेंटल केअर सेंटरचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी कोल्हापूर दक्षिणेचे आमदार अमल महाडिक, हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू), प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सर्व रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधांसह परवडणाऱ्या किमतीमध्ये जागतिक स्तरावरील दंत सेवा प्रदान करण्याचे ध्येय निश्चित करून सर्वांना सर्वोच्च मानकांनुसार उत्तम व समान दर्जाची दंत सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस डाॅक्टर पदमाई दाम्पत्यांनी केला असून त्या सेवेचा लाभ घेण्याचे नागरिकांनी घेण्याचे आवाहन केले
डेंटल केअर सेंटर मध्ये एकाच ठिकाणी दाताच्या सर्व विकारावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व गुणवत्ते मध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करता उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे डाॅ. अमित पदमाई यांनी सांगितले.या डेंटल केअर सेंटर मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान व उपकरणांच्या मदतीने दंत रुग्णावर उपचार केले जाणार आहेत.यावेळी श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील,वडगांव शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील,वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीनिवास डोईजड (काका),वारणा दूध संघाचे संचालक अभिजित पाटील (आबा),सोमराज बाबा देशमुख (सरकार), भाजप महाराष्ट्र राज्य किसान मोर्चाचे अध्यक्ष राजेश पाटील, डाॅ.सुभाष पाटील, सलिम महात, निशिकांत पदमाई, कृष्णा खवरे, महेश चव्हाण, प्रा.वैभव बुढढे, शिरोली पुलाची गावचे सरपंच कृष्णत करपे,प्रदिप शेटे (सर),अजय कोरे,सुरेश जमखंडे,सुभाष केरीपले, संजय सगरे,राजू सगरे आदी मान्यवर उपस्थित होते.