पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिरोली एमआयडीसी येथील मयुर फाट्यावर दुचाकीस्वारास वाचविताना कोल्ड्रिंक्स घेवून जाणारा ट्रक २० फूट ब्रिजवरून खाली सेवा रस्त्यावर कोसळला. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. पण या अपघातात ट्रकचे लाखोचे नुकसान झाले आहे.
शिरोली पोलिसातून मिळालेल्या माहिती अशी पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मयुर फाट्यावर आज सोमवारी दुपारी ३ वाजण्यासुमार भरधाव वेगाने गडमुडशिंगी येथील वेअर हाऊस गोडाऊनकडे कोल्ड्रिंक्स घेवून जाणारा रोकडीया ट्रान्सपोर्टचा ट्रक (क्र. एम एच 16 सी ए 8250) हा समोरील दुचाकीस ओवरटेक करत होता. अचानक कार चालकाने कार आडव मारल्याने दुचाकीस्वारास वाचवण्याच्या नादात ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक हायवे ब्रिजवरून २० फूट सेवा रस्त्यावर कोसळला. या ट्रकमध्ये नगर येथील कोल्ड्रिंक्स फॅक्टरीमधून आणलेले कोल्ड्रिंक्सचे बॉक्स होते.