दिल्लीच्या विजयाने आगामी निवडणुकांसाठी नवा उत्साह
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवल्यानंतर हातकणंगलेत भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.विजयानंतर शहरातील प्रमुख ठिकाणी एकत्र येऊन कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि साखरपेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला.याप्रसंगी भाजपाचे हातकणंगले शहराध्यक्ष अमर इंगवले म्हणाले की,दिल्लीत भाजपाने मोठ्या फरकाने विजयी होऊन एक हाती सत्ता मिळवली आहे.गेल्या तीन निवडणुकीमध्ये काँग्रेसचा तर सुपडासाफ झालेला आहेच यासह आप या पक्षाचा देखील दारूण पराभव झालेला आहे.या विजयात महाराष्ट्रातील दिग्गज भाजपा नेत्यांसह महायुतीच्या नेत्यांचे देखील दिल्लीत विशेष सहकार्य लाभले आहे.अश्याच प्रकारचे यश भाजपाला नेहमी मिळत राहणार आहे.आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत.यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून विजयाचा आनंद साजरा केला.तसेच “भारत माता की जय” आणि “भाजप जिंदाबाद” च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या नेतृत्वाच्या प्रभावी कार्यपद्धतीचा परिणाम असल्याचे सांगितले. यावेळी भाजपा हातकणंगले शहराध्यक्ष अमर इंगवले,दिनानाथ मोरे,मयूर कोळी,सुदेश मोरे, राजेंद्र वाडकर,आण्णासो पाटील,संतोष कांबळे, दीपक कुंभार,आर्यन चौगुले,प्रदीप वाडकर, पप्पू गवळी, अभिषेक कोळी आदी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.