उदगाव येथे तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून

Spread the love

उदगाव / प्रतिनिधी

उदगाव तालुका शिरोळ येथे पूर्व वैमन्याशातून तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून

केल्याची घटना घडल्याने उदगावसह परिसरात खळबळ उडाली आहे.ही घटना आज रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास उदगाव जयसिंगपूर रोडवरील खोत पेट्रोल पंपाजवळील समृद्धी परमिट रूप बियर बार मध्ये घडली आहे.विपुल प्रमोद चौगुले वय वर्ष 20 राहणार उदगाव असे मृत तरुणाचे नाव आहे.खुणाच्या घटनेनंतर जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की उदगाव तालुका शिरोळ येथील विपुल प्रमोद चौगुले हा संशयित आरोपी हे उदगाव येथील समृद्धी परमिट रूम बियर बार मध्ये दारू पीत बसले होते.यावेळी संशयित आरोपी दोघांनी अचानक विपुल चौगुले याच्यावर धारदार शस्त्राने वार केले व घटनास्थळावरून पसार झाले.हल्ल्याने रक्तत्राव झाल्याने विपुलचा जागीच मृत्यू झाला आहे.घटनास्थळी जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.तसेच खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही मात्र पूर्व वैमन्याशातून खून झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. आरोपीच्या शोधासाठी जयसिंगपूर पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. घटनास्थळी आज एक वाजता माहिती घेण्याचे काम सुरू आहे.विपुलच्या खुनामुळे सहा महिन्यातील हा दुसरा खून झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!