पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
गांजा सेवन करणारे व विक्री करणाऱ्यांची शिरोली व नागाव परिसरातून शिरोली पोलीसानी काढली धिंड यामुळे गांजा विक्री करणाऱ्यांची धाबे दणाणले पण फक्त गांजा सेवन करणारे अथवा विक्री करणारे यांच्यावर कारवाई केली पण त्यांना कोण गांजा पुरवतो याचा शोध पुलाची शिरोली पोलिसांनी घ्यावा तरच आजची युवा पिढी वाचणार असल्याचे मत महाराष्ट्र प्रतिष्ठान अध्यक्ष निरंजन शिंदे यांनी आज रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता दिली आहे.यावेळी शिंदे यांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक करत पुढे म्हणाले दोन दिवसांपूर्वी पुलाची शिरोली पोलीस ठाण्याच्या हददीतील शिरोली,माळवाडी तसेच नागाव परीसरात गांजा विक्री व सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी लक्ष ठेवून कारवाईच्या उद्देशाने गस्त घालत असताना जियाऊददीन ताजुददीन मुल्ला रा.सनदे गल्ली पुलाची शिरोली,प्रेमकुमार जोखनलाल रा.संभाजी नगर नागाव,कुलदीप उजागिर राम रा.माळभाग नागाव ता. हातकगणले हे गांजा सेवन करीत असताना मिळुन आलेने त्यांना शिरोली पोलिस ठाण्याच्या गस्त पथकाने पकडून त्यांच्यावर कारवाई करुन त्यांची शिरोली पुलाची,माळवाडी व नागाव परीसरात धिंड काढली.शिरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणीही अवैद्यरित्या अंमली पदार्थाचा साठा अथवा विक्री करीत असल्यास त्याची माहीती पोलीसांना द्यावी असे अवाहन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांनी केले आहे.हा गांजा ते कोठुन आणतात यांचा अधिक तपास सुरु आहे.ही कारवाई सहाय्यक पोलीस उप निरीक्षक प्रमोद चव्हाण,पोलीस उप निरीक्षक अमित पांडे,पोलीस हेड काॅन्स्टेबल ऋषिकेश पवार,नजीर शेख,सुहास संकपाळ,
पाटील यांच्या पथकाने केली.गांजा विक्री व सेवन करणाऱ्यावर कारवाई केली ही अभिनंदनीय गोष्ट आहे.पण अशी प्रकारची कारवाई परिसरात खुलेआम चालू असणाऱ्या जुगार,मटका,चोरी या सारख्या अवैद्य व्यवसायावर करावी अशी मागणी देखील निरंजन शिंदे यांनी केली आहे.