उदगाव येथील तरुणाच्या खुनातील आरोपींना चार तासात जयसिंगपूर पोलिसांनी केले जेरबंद

Spread the love
उदगाव / प्रतिनिधी
उदगाव येथील तरुणाचा खुनातील आरोपींना पकडण्यात जयसिंगपूर पोलिसांना यश आले आहे.सांगली आकाशवाणी येथून अनिकेत तानाजी मोरे वय वर्ष 22 राहणार बेगर वसाहत उदगाव व नागेश मारुती जाधव वय वर्ष 29 राहणार बेगर वसाहत उदगाव अशी संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी अवघ्या चार तासातच उदगाव येथील खुनाचा छडा लावला आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की विपुल प्रमोद चौगुले व संशयित आरोपी अनिकेत मोरे,नागेश जाधव हे उदगाव येथील रहिवासी असून आरोपी अनिकेत मोरे व विपुल चौगुले यांच्यात मागील वर्षी मोहरम सनानिमित्त एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून वाद झाला होता.हाच राग

 

मनात धरून आज संशयित आरोपींनी संगणमत करून उदगाव जयसिंगपूर रोडवरील खोत पेट्रोल पंपाजवळील समृद्धी परमिट रूम बियर बार येथे विपुल चौगुले यांला मारहाण व पोटावर चाकूने वार करून खून केला आहे.ही घटना आज रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मध्ये घडली आहे. खुनाच्या घटनेनंतर जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली होती.सदर संशयित आरोपी सांगली येथील आकाशवाणी केंद्राजवळ फिरत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली त्यानुसार पोलिसांनी आज रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता सांगली आकाशवाणी केंद्राजवळ सापळा रचून संशयित आरोपी अनिकेत मोरे व नागेश जाधव यांना दोघांना ताब्यात घेतले.यावेळी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उदगाव येथील विपुल चौगुले खुन केल्याची कबुली दिली आहे.त्यानुसार संशयित आरोपींना जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम,पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने,पोलीस हेडकॉन्स्टेबल मांजरे,पोलीस हेडकॉन्स्टेबल जालिंदर पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब चव्हाण, पोलीस नाईक ताहीर मुल्ला,अभिजीत भातमारे, वैभव सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल राजाराम लाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल अमर वासुदेव यांच्या पथकाने केली

error: Content is protected !!