स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला बेदम मारहाण करून ट्रॅक्टर पळवला
पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे
स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या ९ ते १० जणानी ट्रॅक्टर ड्रायव्हरला बेदम मारहाण करून संभापुर ता.हातकणंगले येथून जबरदस्तीने ट्रॅक्टर पळवून नेला.ही घटना शनिवारी दि.१ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजण्यासुमारास संभापूर तासगांव रस्त्यावर घडली.गेली आठ दिवस पोलिस ठाण्याच्या पायर्या झिजवून गुन्हा नोद करण्यास शिरोली पोलिसांची टाळाटाळ करीत असल्याचा आरोप सदाशिव आंधळे यांनी आज रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता दिली आहे.याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांना ही निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत सदाशिव आंधळे यांनी दिलेली माहिती अशी टोप संभापुर हद्दीतून शनिवारी दि. १ फेब्रुवारी रात्री ८:३० वाजण्यासुमारास सदाशिव नामदेव आंधळे वय. ३३, रा. मुळ गाव बिड सध्या राहणार शरद साखर कारखाना,नरंदे हे ऊसतोड मजूर आपल्या पत्नी व अन्य कामगार घेवून नरंदे साखर कारखाना परिसरात राहून परिसरातील ऊस तोडून तो कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखान्याला गाळपासाठी शनिवारी १ फेब्रुवारी रात्री ही ८: ३० वाजण्यासुमार जात असताना संभापुर गावच्या हद्दीत स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या ९ ते १० जणानी ट्रॅक्टर थांबवून ड्रायव्हर अतुल राठोडला बेदम मारहाण केली.ड्रायव्हर बेशुद्ध झाल्यावर ऊसाने भरलेली ट्राॅली तिथेच सोडून ट्रॅक्टर क्रमांक.एम एच ४४ झेड ४४८२ घेवून फरार झाले.राठोड शुध्दीवर येताच त्याने मालकाच्या पत्नी फोन करून सर्व घटनाक्रम सांगितला त्यानुसार मालकाने ट्रॅक्टरचा सर्वत्र शोध घेतला पण सापडला नाही त्यामुळे त्याने शिरोली पोलिसात धाव घेतली.पण पोलिसांनी दाद घेतली नाही आठ दिवस पोलिस ठाण्याच्या पायर्या झिजवून देखील पोलिस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत आहेत.सदाशिव आंधळे, हे मुळचे बिडचे असल्याने त्यानी आपल्या गावच्या आसपासच्या परिसरातील तिघा व्यक्तींशी ट्रॅक्टरचा व्यवहार करून ट्रॅक्टर घेवून गेले होते. त्यानी ठरलेल्या व्यवहारानुसार बँकेचे काही हप्ते चुकवल्याने त्याचा व्यवहार पुर्ण न झाल्याने आंधळे यानी आपला ट्रॅक्टर पोलिसांच्या मध्यस्थीने परत आणला होता.पण त्याच तिघांनी आपला ट्रॅक्टर चोरून नेला असल्याचा संशय व्यक्त केला आहे.पण पोलिसांनी संबंधित लोकांकडे चौकशी केली नाही.असा आरोप अर्जात केला आहे.ट्रॅक्टर टाॅलीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो आहे.त्यामुळे पोलिसांनी दिलेल्या तिघा संशयीत चोरट्यांकडे चौकशी करून आपला ट्रॅक्टर मिळावा अशी विनंती पोलिसाना केली आहे.