हातकणंगले / प्रतिनिधी
दिल्ली विधानसभा निवडणूकी मध्ये भारतीय जनता पार्टी ने मिळवलेला निर्वावाद यशा बद्दल हातकणंगले येथील पाच तिकटी येथे भाजपाच्या वतीने साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.हातकणंगले भाजपचे शहराध्यक्ष अमर इंगवले (नाना) यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतिशबाजी करून पेढे व साखर वाटून भाजपच्या मिळवलेल्या नेत्रदिपक कामगीरीची कौतूक करण्यात आले यावेळी भाजपचे कार्यकते सुभाष मोरे,सुदेश मोरे,दिनानाथ मोरे,नगरसेवक मयूर कोळी, आण्णासो चौगुले,रावसाहेब चौगुले,राजू वाडकर आदि उपस्थित होते.