शिरोळ / प्रतिनिधी
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय घोष, आण्णा महाराजांचा जयजयकारात परमपूज्य सद्गुरू श्री आण्णा महाराज यांची तृतीय पुण्यतिथी उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
अमृत लाट (ता शिरोळ ) येथील परमपूज्य सद्गरु श्री अण्णा महाराज यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. पहाटे पाच वाजता परमपूज्य अण्णा महाराज यांच्या समाधीस अभिषेक करण्यात आले. आठ वाजून 32 मिनिटांनी समाधीवर पुष्पवृष्टी वाहण्यात आली. लिंगनूर चे परमपूज्य श्री धामस्वामीजी महाराज व गणेशवर अवधूतजी महाराज यांच्या अधिपत्याखाली हा धार्मिक सोहळा संपन्न झाला.
परमपूज्य सद्गुरु आण्णा महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंदिराभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहाटेपासूनच दर्शनासाठी अमृतलाट,शिरोळ, इचलकरंजी,यासह अन्य भागातून भाविकांची रांग लागली होती.परमपूज्य सद्गुरु अण्णामहाराजांचे परमशिषय महादेव महाराज,राजू महाराज यांच्यासह परमपूज्य आणणा महाराज बहुउद्देशीय चारीटेबल ट्रस्टच्या सर्व संचालक आणि पदाधिकाऱ्यांनी भाविकांनी सोहळा साजरा करण्यासाठी परिश्रम घेतले.यावेळी महाप्रसाद तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.