३ किलोमीटरचा दंडवत घालणाऱ्या अमोल गावडे यांचा आ.अशोकराव माने यांच्या वतीने सत्कार

Spread the love

कुंभोज / प्रतिनिधी

हातकणंगले येथील जनसुराज पक्षाचे कट्टर समर्थक अमोल गावडे यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या हातकणगले विधानसभा निवडणूकीत अशोकराव माने हे विजयी व्हावेत यासाठी कुंभोज येथील हिवरखान बिरदेव देवाला साकडे घातले होते.त्यामध्ये त्यांनी अशोकराव माने हे विजयी झाल्यास वारणा नदीपासून हिवरखान बिरदेव मंदिरापर्यंत दंडवत घालणार असल्याचे जाहीर केले होते.त्या अनुषंगाने त्यांनी आज अमावस्येची अवचित्य साधून सदर दंडवत पूर्ण केला.याची दखल घेत हातकणंगले विधानसभेचे विद्यमान आमदार अशोकरावजी माने यांनी कुंभोज येथे अमोल गावडे यांची भेट घेऊन अमोल गावडे यांचा सत्कार केला.तसेच अशा सच्च्या प्रामाणिक कार्यकर्त्यामुळेच माझा विजय झाला असल्याचे मत ही त्यावेळी बोलताना व्यक्त केले.यावेळी धनगर समाजातील कार्यकर्ते तसेच जनस्वराज्य भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!