चिपरी / प्रतिनिधी
चिपरी येथील जैन बस्ती परिसरात बंद घरामध्ये एका व्यक्तीचा सडलेला मृतदेह गळफास
घेतलेल्या स्थितीत आढळून आला.मृत व्यक्तीची ओळख राजू कुमार उपाध्ये वय 40 रा.चिपरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.घरामधून दुर्गंधी सुटल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली.जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता सदर घटना उघडकीस आली आहे.घरातून सुटणाऱ्या अतिशय दुर्गंधीमुळे पोलिसांनी तत्काळ समर्पण सेवा, हातकणंगले यांच्याशी संपर्क साधला. समर्पण सेवा संस्थेच्या स्वप्नील नरूटे,शुभम पांडव,सौरभ कांबळे आणि राम कोरे यांच्या मदतीने मृतदेह घरातून बाहेर काढण्यात आला.मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता जयसिंगपूर पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह अंतसंस्कारासाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती जयसिंगपूर पोलिसातून मिळाली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.याप्रकरणी पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत.