औरवाड / प्रतिनिधी
महाराष्ट्र कर्नाटक राज्यांना जोडणाऱ्या औरवाड गणेशवाडी राज्य मार्गावर आज बुधवार, 29 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एक मोठा अपघात घडला.सिमेंट पत्रे घेऊन जाणारा सोळा चाकी माल वाहतुक करणारा ट्रक AP 39 UX 4767 हा अचानक पलटी झाला.ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला.घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक पलटी होऊन त्याचे मोठे नुकसान झाले असून,ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे.अपघाताच्या नंतर लगेचच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने ट्रक चालकाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.ट्रकवरील मालाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मात्र दुपारीपर्यंत अपघाताची अधिकृत नोंद कुरुंदवाड पोलिस ठाण्यात झाली नव्हती.