अन्यथा पुढील आंदोलन तीव्र काँग्रेस कार्यकर्त्यांचा इशारा

Spread the love

कुंभोज / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने एसटीमध्ये 14%  भाडेवाढ केली असून या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.कारण उद्योगपतीचे लोक एसटीने प्रवास करत नाहीत सर्वसामान्य नागरिकच एसटीने प्रवास करतात त्यासाठी परिवहन मंडळाने एसटीमध्ये 14% भाडेवाढ मागे घ्यावी अन्यथा पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे करू असा इशारा काँग्रेस पार्टी इचलकरंजी प्रमुख शशांक बावचकर यांनी आज बुधवार दिनांक 29 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता इचलकरंजी आगार प्रमुख यांना निवेदनाद्वारे दिला आहे.एसटी दरवाढीच्या विरोधात आज इचलकरंजी येथील एसटी बस स्थानकामध्ये महायुती सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. गोरगरीब जनता एसटीतून प्रवास करत असते.त्यांना ही दरवाढ परवडणारी नाही. महायुती सरकारने एसटी भाडे वाढ मागे घ्यावी अन्यथा कॉग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बावचकर यांनी दिला आहे.दरवाढ संदर्भातील निवेदन बस स्थानक आगार प्रमुख शिल्पा थोरात यांना देण्यात आले आहे.यावेळी इचलकरंजी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!