पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
राष्ट्रसेवा शिक्षण प्रसारक मंडळ शिरोली पु. संचलित राष्ट्रसेवा प्रशाला शिरोली पु. येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनील गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले .मान्यवरांच्या हस्ते राष्ट्र पुरुषांच्या व स्वातंत्र्यसेनानींच्या प्रतिमांची पूजन झाले. तसेच भारतीय संविधानाची पूजा करून सदर कार्यक्रमास सुरुवात झाली. ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाले नंतर कवायत, मनोरे तसेच राष्ट्रभक्तीपर समूहगीत इत्यादी कार्यक्रम पार पडलेत. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गीतरुपी सामूहिक संविधानाचे पठण केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक सुनील गायकवाड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की या शाळेचे अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत उच्च पदावर काम करत आहेत ही बाब निश्चितच शाळेत शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामध्ये या शाळेचे सर्व शिक्षक तसेच संस्थेचे सर्व संचालक यांचे मार्गदर्शन खूपच अनमोल आहे. याप्रसंगी प्रजासत्ताक फाउंडेशन शिरोली पु.यांचे वतीने संविधानाच्या उद्देशिके च्या प्रतींचे वाटप विद्यार्थी व पालक यांच्यासाठी करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाजीराव सातपुते यांनी इ.पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या कु पूर्वा पाटील हिने “संदेशे आते है ” हे गीत खूपच छान प्रकारे सादर केले बद्दल रोख बक्षीस देऊन गौरव केला.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा बाजीराव सातपुते साहेब ,संचालक एस बी चौगुले , पी डी निकम , शांतिनाथ कुन्नुरे, प्रताप चोपडे ,शशिकांत चव्हाण तसेच आयजीएम रुग्णालय इचरकंजी चे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम सिंह नांगरे साहेब, एलिट हॉस्पिटल शिरोली पु.चे डॉ. विजयकुमार बर्गे साहेब रायेश होंडा शिरोली पु. चे श्री दीपक माने मातोश्री अकॅडमीचे विद्यार्थी व शिक्षक तसेच अनेक पालक माझी माजी विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते .कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सारीका कुंभार एस एस यांनी केले कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक चंद्रकांत कुंभार ,संग्राम भुयेकर, एस व्ही चव्हाण , शाहरुख मनेर, गणेश वागवे , जाधव व सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले .