पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील प्राथमिक व माध्यमिक प्रशाला विलासनगर या प्रशालेमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव सामाजिक कार्यकर्ते सतीश रेडेकर उद्योजक महंमद वेळापुरे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते
ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले संस्थापक अध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ध्वजारोहण करण्यात आले .
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत वाकरेक यांनी केले विद्यार्थ्यांनी तालासुरामध्ये समूह गीत गायन केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी संगीत साधन कवायत सादर केली इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी देश पर गीतावर नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.तसेच श्वेत माने या विद्यार्थ्याने सुनो गौर से दुनियावालो या गीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले अभ्यास कसा परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तसेच इयत्ता आठवीचे विद्यार्थी कौतुक प्रि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ताधारक झाल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला या प्रशालेमध्ये स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांच सत्कार करण्यात आला.इयत्ता बालवाडी के नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी थोर समाज सुधारक व क्रांतिकारक यांच्या विषयी मराठी हिंदी इंग्रजी या भाषेमध्ये सुंदर भाषणे केली या कार्यक्रमाचे नियोजन कुंडलिक जाधव , शशिकांत पाटील,वंदनू पाटील, अभिजीत जाधव यांनी केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष सदाशिव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा कडे वळावे आपल्या प्रशालेचा एक तरी विद्यार्थी जिल्हाधिकारी , उच्च पदावर ती कार्यरत व्हावे तसेच सैन्य भरती मध्ये पोलीस भरतीमध्ये मोठे अधिकारी व्हावा अशी इच्छा व्यक्त केली . तसेच शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत वाकरेकर शाळेची वाटचाल व पुढील ध्येय धोरणे याची माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंडलिक जाधव , वंदना पाटील यांनी केले शशिकांत पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले त्यानंतर वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली उद्योजक मोहम्मद येळापुरे यांनी मुलांना जिलेबी वाटप केले व कार्यक्रमाची सांगता झाली.