शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहरातील 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले.शिरोळ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या हस्ते आज रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी साडे सात वाजता ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली.तर शिरोळ पंचायत समितीच्या प्रांगणात पाणी पुरवठा विभागातील स्वच्छता कर्मचारी उदय शिंदे यांच्या हस्ते आज रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी साडे आठ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी न्यू इंग्लिश स्कुल व श्री पद्माराजे विद्यालयांच्या NCC व RSP विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व ध्वजाला मानवंदना दिली.उदय शिंदे यांचा गट विकास अधिकारी नारायण घोलप यांच्या हस्ते प्रशिस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.यावेळीगटशिक्षण अधिकारी भारती कोळी याच्यासह बांधकाम,आरोग्य, शिक्षक, पाणी पुरवठा कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.