शिरोळ / प्रतिनिधी
देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरदार सोडून लढा दिला वेळप्रसंगी जेलमध्ये शिक्षा भोगली आज स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत.आज रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शिरोळ तालुक्यातील स्वातंत्र सैनिक,वीर माता, वीर पत्नी यांचा सन्मान शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी केला.यावेळी तहसीलदार हेळकर यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या अडीअडचणी समजावून घेत शिरोळ तहसील प्रशासन स्वातंत्र सैनिक व कुटूंबाच्या पाठिशी
खंबीरपणे उभे राहिले असे अभिवचन दिले.