शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथील तहसील कार्यालयात 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आज रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी माजी आमदार उल्हास पाटील,माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, गटविकास अधिकारी नारायण घोलप,पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड,पंचायत समितीचे माजी सभापती मल्लाप्पा चौगुले, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सतीश मलमे यांची प्रमुख उपस्थिती होती.दरम्यान श्री पद्माराजे विद्यालयाच्या विद्यार्थांनी राष्ट्रगीत व राज्य गीत सादर केले.शिरोळ येथील मध्यवर्ती कार्यालय येथे ध्वजारोहण झाल्यानंतर तहसीलदार अनिलकुमार हेळकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी माजी आमदार उल्हास पाटील यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.यावेळी शिरोळ शहरातील लोकप्रतिनिधी,आजी-माजी सैनिक,प्राथमिक शाळा,विद्यालय,हायस्कूलचे विद्यार्थी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.