शिरोळ / प्रतिनिधी
भारतीय 76 वा प्रजासत्ताक दिन शिरोळ शहरातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय विविध बँका पतसंस्था विकास सेवा सोसायटी दूध संस्था माध्यमिक व प्राथमिक विद्यालय सार्वजनिक तरुण मंडळ या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात पार पडला.शिरोळ नगरपरिषदेच्या कार्यालयात मुख्याधिकारी तथा प्रशासक निशिकांत प्रचंडराव यांच्या हस्ते
आज रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी साडे आठ वाजता ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी माजी आमदार उल्हास पाटील,माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र माने यांच्यासह सर्व नगरसेवक शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. याठिकाणी संविधानाचे सामूहिक वाचन श्री पद्मराजे विद्यालयांच्या विद्यार्थानी केले.तसेच उपस्थितांना वसुंधरेची शपथ देण्यात आली. यावेळी विविध लोकप्रतिनिधी नगरसेवक विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.