आरोग्यास धोकादायक असणारा मोबाईल टॉवर काढण्याच्या मागणी शिरोळ तहसील समोर उपोषण

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ येथील बाजारपेठ भागातील राजवाडा येथे विनापरवाना मोबाईल टॉवर उभारल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.याबाबत गेल्या दोन वर्षापासून नागरिक तक्रार करीत आहेत.पण या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ आज रविवार दिनांक २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिना दिवशी सकाळी साडे अकरा वाजता शिरोळ तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते एम.एस.माने म्हणाले शिरोळ बाजार पेठ येथील टॉवरच्या परिसरात 25 मीटरवर प्राथमिक शाळा असून नागरी वस्तीतील मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे सीनियर सिटीजन लोकांना वारंवार रक्तदाब,अंगदुखी,अशक्तपणा,डोकेदुखी तसेच प्रदूषणामुळे वयोवृद्ध व लहान मुलांना दमा सारखे आजार उद्भवत आहेत.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक असणारा हा मोबाईल टॉवर काढून

टाकण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास सोमवार पासुन प्राणातीक उपोषण सुरू करणार असल्याचे माहिती माने यांनी दिली आहे.यावेळी,दरगु पाटील,वैभव माने,भाऊसाहेब माने,दिलीप संकपाळ आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!