कॉम्रेड गिरीश फोंडे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Spread the love

एक वर्षापूर्वी पवित्र पोर्टल मधून निवड झालेल्या शिक्षकांना अन्य शैक्षणिक संस्थेत सामावून घ्यावे याचा उपमुख्यमंत्री यांना जाब विचारण्याचा निर्णय घेतलेले या समितीचे निमंत्रक कॉम्रेड गिरीश फोंडे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या या कृतीचा आणि पोलिसांच्या हुकूमशाहीचा जाहीर निषेध केला.

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

पवित्र पोर्टल मधून गेला फेब्रुवारी २०२४ मध्ये रयत शिक्षण संस्थेसाठी निवड झालेल्या आठशे वर शिक्षकांना अन्य संस्थेत सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात त्यांना जाब विचारण्याचा निर्णय शिक्षक कृती समितीचे निमंत्रक कॉम्रेड गिरीश फोंडे यांनी दिला होता.शिरोली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र शासनाचे कृतीचा आणि शिरोली पोलिसांच्या हुकूमशाहीचा जाहीर निषेध केला.पवित्र पोर्टल मधून एक वर्षांपूर्वी रयत शिक्षण संस्थेसाठी शिक्षकांची निवड करण्यात आली होती. मात्र या संस्थेतील भरतीला उच्च न्यायालयाची स्थगिती आहे.त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पक्षाचे माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या शिक्षकांना इतर संस्थांमध्ये सामावून घेण्याचे आदेश दिले होते.परंतु त्यांच्याच पक्षाचे नूतन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.आज या दोन्ही मंत्र्यांचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा आहे. या दौऱ्यात पवित्र पोर्टल निवड शिक्षक कृती समितीच्या वतीने त्यांना जाब विचारणेचा निर्णय घेण्यात आला होता .तत्पूर्वी शिरोली पोलिसांनी या कृती समितीचे निमंत्रण कॉम्रेड गिरीश फोंडे यांना ताब्यात घेतल्याने त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या या कृतीचा व पोलीस हुकूमशाहीचा जाहीर निषेध केला.खरे तर पोलिसांनी उपमुख्यमंत्री यांच्याशी भेट घडवून आणून चर्चा करणे अपेक्षित असताना या कारवाईमुळे त्यांचा निषेध व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!