ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

Spread the love
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुलाची शिरोली येथील संभाजी दत्तू बाटे एज्युकेशन सोसायटीचे ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शिवानी मंगल कार्यालय येथे नुकताच पार पडला या स्नेहसंमेलनामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई लहान लहान चिमुकल्यांनी भावगीत, भक्तीपर गीत,देशभक्तीपर गीते,नृत्य,रेप केस नाटिका, मर्दानी खेळ,कराटे डेमो,तसेच विविध सांस्कृतिक नृत्य या चिमुकल्याणी सादर केली २०१७ साली या स्कूलची सुरुवात झाली गेली आठ वर्ष ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल ज्ञानदानाचे कार्य करीत आहे.या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षा  श्रीमती शालन संभाजी बाटे या होत्या प्रमुख उपस्थिती संस्थापक अध्यक्ष संतोष बाटे,प्रिन्सिपल सौ.मनीषा बाटे,माजी आमदार डॉ. सुजित मिंचेकर,माजी लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे,माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण,अनिल खवरे,राजकुमार पाटील,सतीश रेडेकर, मुकुंद नाळे,पत्रकार राजू पाटील,नितीन दळवी, पत्रकार गणपती लुगडे,नितीन चव्हाण,राजू सुतार,रणजीत केळुसकर,मुकूंद नाळे,अशोक लोंढे,शितल लोंढे,दत्तात्रेय साळुंखे संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे संस्थापक संतोष बाटे यांनी केले दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती शालन बाटे व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक सीमा लोखंडे यांनी केले.सर्वप्रथम या चिमुकल्यांनी गणेश वंदना सादर केली.त्यानंतर भावगीते,भक्ति गीते,देशभक्तीपर नृत्य,रेप केस नाटिका मर्दानी खेळ,कराटे डेमो याचबरोबर विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाईची थीम सादर केल्यामुळे जणू पंढरीच अवतरली असल्याचा अनुभव उपस्थिताना लाभला.विद्यार्थांनी उपस्थितांची मने जिंकली अशा सुंदर रित्या सादरीकरण या चिमुकल्याणी केले.दरवर्षीप्रमाणे बेस्ट गर्ल नेत्रा बुच्चे,बेस्ट बॉयअर्पित मोरया,बेस्ट टीचर अवॉर्ड प्रतीक्षा पाटील यांना मिळाला या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष बाटे ,सौ.मनीषा बाटे यांनी केले.संमेलनाचे सूत्रसंचालन सीमा लोखंडे यांनी केले प्रतीक्षा पाटील,पुनम बागी,सारिका काळे,कविता ढेंबरे प्राजक्ता पाटील,

कविता कश्यप,मीनाक्षी पाटील,दीक्षा लोहार या सर्वांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!