कोल्हापूर अमॅच्युअर फोटोग्राफर्स असोसिएशनचे 8 वे छायाचित्र प्रदर्शन

Spread the love

कोल्हापूर अमॅच्युअर फोटोग्राफर्स असोसिएशन चे 8 वे छायाचित्र प्रदर्शन शनिवार दि.25 जानेवारी ते सोमवार दि.27 जानेवारी 2025 अखेर शाहू स्मारक भवन, दसरा चौक कोल्हापूर येथे आयोजित केले आहे.
कोल्हापूर अमॅच्युअर फोटोग्राफर्स असोसिएशन हा कोल्हापूर जिल्हा व आजूबाजूच्या जिल्ह्यातील एकमेव व पहिला ग्रुप आहे जो फेडरेशन ऑफ इंडियन फोटोग्राफी कडे रजिस्टर आहे.याची स्थापना 26 जानेवारी 2015 रोजी झाली असून 50 हून अधिक सदस्य संख्या असलेल्या या ग्रुपमध्ये विद्यार्थी, नोकरदार, व्यावसाईक, वैद्यकीय,बँकींग अशा सर्वच क्षेत्रातील हौशी छायाचित्रकार आहेत.प्रत्येक महिण्याला मिटींगमध्ये फोटोग्राफी संदर्भात चर्चा,फोटोवॉक आदींचे आयोजन केले जाते यामध्ये लाईट,काम्पोझिशन, स्टोरी,कॅमेरा सेटिंग्ज यासारख्या अनेक विॆषयावर सखोल अभ्यास केला जातो.देश-विदेशातील फोटोग्राफी स्पर्धांमध्ये कसा भाग घेता येतो याबध्दल माहिती व तयारी करुन घेतली जाते.महाराष्ट्रातील व देशभरातील विविध संस्कृतींचे, रुढी -परंपरेंचे, समृध्द निसर्ग आणि जैव विविधतेचे शास्त्रोक्त पध्दतीने छायाचित्रण करुन ते निस्वार्थी भावनेने, कर्तव्य समजून जगभर पोहचवण्याचे काम आमच्या ग्रुपचे सदस्य करीत असतात.मागील कांही वर्षात आमच्या ग्रुपच्या सदस्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक सुवर्ण, रौप्य,कास्य पदके, सर्टिफिकेट मिळवली आहेत तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदव्यासुध्दा संपादन केल्या आहेत व अशी पदवी घेतलेले सदस्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय छायाचित्रण स्पर्धांचे परिक्षक म्हणूण काम करीत आहेत.
कोल्हापूर अमॅच्युअर फोटोग्राफर्स असोसिएशनच्या माध्यमातून आपण फोटोग्राफी सोबत अनेक वेगवेगळ्या उपक्रमातून सामाजीक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे मग तो 2019 चा महापूर असो किंवा कोरोना सारखी महामारी असो आमचे सदस्य समाजाच्या मदतीला धावून गेलेत.समाजामध्ये आपल्या कतृत्वाने कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्यांनी राष्ट्राचे किंबहुना देशाचे नाव जगाच्या पटलावर कोरले त्या सर्वांना मानाचा मुजरा म्हणूण दरवर्षी प्रदर्शनामध्ये आपण अशा व्यक्तिंना सन्मानित करतो.थीमवर आधारीत छायाचित्र प्रदर्शन हे महाराष्ट्रातील एकमेव छायाचित्र प्रदर्शन असे आमच्या प्रदर्शनाचे वैशिठ्य आहे.या प्रदर्शनात आमच्या सदस्यांनी वाईल्ड लाईफ,नेचर,सुक्ष्म जीव,विविध सण- परंपरा,लोक व त्यांची संस्कृती, ट्रॅव्हल,फेस्टिव्हल, जर्नालिझम,ब्लॅक अँड व्हाईट,क्रियेटीव्ह व स्टुडिओ असे अनेक वेगवेगळे विषय घेऊन केलेले कलात्मक छायाचित्रण 350 हून अधिक छायाचित्रातून पहावयास मिळेल.सदरची छायाचित्रे प्रेक्षकांसाठी मंत्रमुग्ध करणारी पर्वणीच ठरतील.दि.25 जानेवारी 2025 रोजी सदर छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापूरचे ज्येष्ठ चित्रकार श्री जी.एस.तथा गणपतराव माजगावकर यांचे शुभहस्ते सकाळी ठीक 10:00 वा.शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणूण श्री नितीन सोनावने – प्रेस फोटोग्राफर ,मुंबई, गणेश बागल -सोनी अल्फा ब्रँड अंबॅसिडर व सुप्रसिध्द फोटोग्राफर पुणे व सांगलीचे सुनिलबापू लाड उपस्थित राहणार आहेत आणि या सर्वांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रात उत्तुंग कामगीरीने देशवासी म्हणूण आम्हाला ज्यांचा अभिनान वाटतो अशा व्यक्तिंना….श्री पै.विष्णू जोशिलकर -महाराष्ट्र केसरी, श्री दयानंद भगत – ज्येष्ठ शिल्पकार आणि चित्रकार, गोवा,श्री लखन जाधव – प्रधान आचार्य सव्यासाची गुरुकुलम,श्री स्वप्निल कुसाळे -औलंपिक रोप्य पदक विजेते, सुप्रसिध्द आर.जे.सुमित, पत्रकार श्री शेखर पाटील यांना सन्मानित केले जाणार आहे.दि.25 ते 27 जानेवारी अखेर सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत छायाचित्र प्रदर्शन विनामुल्य पाहता येईल.कलाप्रेमीं बरोबरच करवीरवासियांनीसुध्दा या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष श्री संतोष बजरंग काळे व सेक्रेटरी श्री अभिजीत आडूरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.

error: Content is protected !!