स्व.दत्ताजीराव कदम आण्णा यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने विनम्र अभिवादन

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

दत्त कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार सहकार महर्षी स्व.दत्ताजीराव कदम आण्णा यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारती समोर उभारण्यात आलेल्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करुन साजरी करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व. दत्ताजीराव कदम आण्णा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे स्व.डॉ सा रे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास व्हॉईस चेअरमन शरदचंद्र पाठक यांनी , स्व.दिनकरराव यादव यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक रणजित कदम यांनी व स्व. विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक प्रमोद पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी कारखान्याचे संचालक अनिलकुमार यादव, बाबासो पाटील,शेखर पाटील,बसगोंडा पाटील,अमर यादव,सुरेश कांबळे,विजय सूर्यवंशी , दरगू माने-गावडे, बाळासाहेब पायही हालसवडे,मंजूर मेस्त्री कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील, कारखान्याचे सचिव अशोक शिंदे यांचेसह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.तसेच तातोबा पाटील,शिवाजी पाटील कौलवकर,महादेव कुलकर्णी,पी जी पाटील ,उत्तमराव पाटील चंद्रकांत दाभाडे ,तुकाराम पाटील,श्रीकांत मोहिते यांचेसह महाराष्ट्र व कर्नाटकातील सभासद, कार्यकर्ते तसेच कामगार युनियन, कामगार सोसायटी, पॉलिटेक्निक कॉलेज, आयटीआय व दत्त भांडारचे सर्व संचालक, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

error: Content is protected !!