शिरोळ पोलिस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष सन्मान

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड  यांना सन 2024 मध्ये प्रभावी कामगिरी केल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्ह्यांची उकल करण्यासाठी त्यांनी दाखवलेली कार्यक्षमता वाखाणण्याजोगी ठरली आहे. नुकतेच राज्यात तील पाच पोलीस स्टेशन ला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.त्यामध्ये शिरोळ पोलीस ठाण्याचा क्रमांक लागलेला आहे.शिवाजीराव गायकवाड   यांनी 2024 मध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यांपैकी बहुसंख्य
गुन्ह्यांची उकल केली आहे अनेक गुन्हे उघडकीस आणले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला आहे.त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कठीण गुन्ह्यांची उकल करण्यासाठी अतिशय प्रभावी पद्धतींचा वापर केला.
या कामगिरीची दखल घेत जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात पोलिस अधीक्षकांनी गायकवाड यांच्या कौशल्याचे आणि मेहनतीचे कौतुक केले. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे शिरोळ परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक दृढ झाली असल्याचे अधीक्षकांनी नमूद केले.पोलिस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी हा पुरस्कार स्वीकारताना आपल्या यशाचे श्रेय संपूर्ण पथकाला दिले. त्यांनी सांगितले की, गुन्हेगारांना न्यायापर्यंत पोहोचवणे हे पोलिस दलाचे कर्तव्य असून या यशाने त्यांचे आणि त्यांच्या पथकाचे मनोबल उंचावले आहे.गायकवाड यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पोलिस दलातील अन्य कर्मचाऱ्यांनाही उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रोत्साहन मिळाले आहे.

error: Content is protected !!