शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथे सागर उर्फ शिवराम काळे आणि प्रणव काळे यांच्या घराला आग लागून मोठे नुकसान झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे काळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून त्यांच्या घरातील सर्व मालमत्ता जळून खाक झाली आहे.या संकटातून सावरण्यासाठी सामाजिक जबाबदारी जपत युवा पर्व फाउंडेशन, शिरोळ यांच्याकडून काळे परिवाराला पाच हजार रुपये रोख स्वरूपात मदत करण्यात आली आहे. फाउंडेशनने या प्रसंगी समाजातील नागरिकांना आवाहन केले आहे की, काळे कुटुंबाला शक्य ती मदत करून या कठीण परिस्थितीत त्यांना आधार द्यावा.युवा पर्व फाउंडेशनने घेतलेली ही सामाजिक बांधिलकी सर्वांसमोर एक आदर्श ठरली आहे. जास्तीत जास्त शिरोळकरांनी पुढे येऊन आर्थिक आणि मानसिक पाठबळ देत काळे कुटुंबाला या संकटातून सावरण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन फाउंडेशनने केले आहे.संकटाच्या वेळी समाजाचा पाठिंबा हीच खरी ताकद आहे. त्यामुळे या कठीण प्रसंगात काळे कुटुंबाला मदतीचा हात देऊन त्यांना नव्याने उभे राहण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असा संदेश देण्यात आला आहे.युवा पर्व फाउंडेशनचे सदस्य , दिग्विजय माने (अध्यक्ष शिरोळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस ), विकी शिंदे, दिगंबर इंगळे, वैभव पाटील, पृथ्वीराज शिंदे, सत्यजित मोरे, , रितेश कोळी, प्रतीक संकपाळ, सौरभ काळे अक्षय यादव ,अमन हुक्किरे, प्रतिकेश संकपाळ , सोहन सूर्यवंशी आधी सदस्य उपस्थित होते.काळे कुटुंबाच्यावतीने प्राध्यापक दीपक काळे यांनी मदत स्वीकारली.