मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत काम करणाऱ्या युवक युवती ने मुदत वाढवून द्या – आमदार डॉ अशोकराव माने यांना निवेदन
कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे
हातकणंगले तालुक्यात शासनाच्या विविध विभागात काम करणाऱ्या प्रशिक्षण योजनेत कार्यरत प्रशिक्षणार्थींनी मुदतवाढ आणि रोजगाराच्या मागणीसाठी आमदार अशोकराव माने (बापू) यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.सध्या प्रशिक्षणार्थी सहा महिन्यांच्या कालावधीत विविध आस्थापनांवर प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी आपल्या निवेदनात हा कार्यकाळ वाढवण्याची मागणी केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या प्रशिक्षणार्थींना प्राधान्याने रोजगार किंवा शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे.मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत युवक व युवतींना कौशल्याधारित प्रशिक्षण दिले जात असून,त्यानंतर रोजगाराची हमी देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते.परंतु, सध्याच्या परिस्थितीत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना कायमस्वरूपी रोजगाराची निश्चिती नसल्याने प्रशिक्षणार्थी चिंतेत आहेत.प्रशिक्षणार्थींनी आमदार अशोकराव माने यांच्याकडे निवेदन देत, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना अधिक प्रभावी करून प्रशिक्षणार्थींना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. व तसेच यावेळी प्रशिक्षण देऊन बेरोजगार असलेल्या युवकांना अनुभव व मानधन दिला पण आता त्यांना मुदतवाढ देऊन काम करण्याचे संधी द्यावी नाहीतर ते परत बेरोजगार होतील अशी खंत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संकेत उर्फ शरद खोत यांनी आमदार माने यांच्याकडे मांडली.यावेळी सुमित भगत, अनिरुद्ध पाटील,साकेब देसाई,राहुल धुळे,सिद्धार्थ कुरणे, अजिंक्य कांबळे,संध्याराणी कोळी,ऐश्वर्या भारते, शशिकला कांबळे, अंजली घोगले,करिष्मा नेतले,अमृता मगदूम,श्रीजीत पाटील,निरजन पाटीत, तानाजी डोमने, सागर चव्हाण,महेश चव्हाण उपस्थित होते.