विनापरवाना सुरू असलेल्या २८ क्रेशर बुधवारी सिल,तहसील पथकाची धडक मोहीम

Spread the love

६२ क्रशर व्यवसायापैकी फक्त ९ व्यवसाईकांकडेच परवाने

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे

टोप,कासारवाडी ता.हातकणंगले येथील विना परवाना बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या मंगळवारी १७ तर बुधवारी २८ असे ४५ क्रेशर व्यवसाय सील करण्यात आली हि माहिती नायब तहसीलदार संदीप चव्हाण यानी दिली.या कारवाईमुळे टोप,कासारवाडीसह शिये परिसरातील क्रशर व्यवसाईकात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि टोप व कासारवाडी येथे मोठ्या प्रमाणात बांधकामासाठी लागणारा दगड , खडी यांचा व्यवसाय चालतो कोट्यवधीची उलाढाल असलेल्या या व्यवसायायात शेकडो डंपर,पोकलँड, जीसीबी शेकडो कामगार काम करत असतात या व्यवसायात क्रश सँड व्यवसायाने काही वर्षात पाय रोवले आहेत.मात्र या व्यवसायासाठी लागणारे शासकीय परवाने न घेताच अनेक जण आपला व्यवसाय चालू ठेवत आहेत व कोट्यावधीची कमाई करत आहेत.अशा रितीने शासकीय अधिकार्यांच्या डोळ्यात धूळ फेकून करून चालू असलेल्या व्यवसायावर हातकणंगले तहसील पथकाने मंगळवारी व बुधवारी धडक कारवाई मोहिम राबवली यामध्ये एकूण ४५ क्रशर हे व्यापारी परवाना नाही म्हणून सिल करण्यात आले.हि कारवाई हातकणंगलेचे नायब तहसीलदार संजय पुजारी,महसूल सहायक निलेश सकपाळ,शिरोली मंडल अधिकारी सीमा मोरे,टोप तलाठी सुनिल बाजरी,शिरोलीचे तलाठी महेश सुर्यवंशी, शिरोली व टोप येथील कोतवाल यानी केली.या बाबत अधिक माहिती अशी कि हातकणंगले तालुक्यातील सुमारे ६२ इतके स्टोन क्रशर व्यवसाय सुरू असून यापैकी हातकणंगले तालुक्यातील फक्त ९ व्यवसाईकांकडे परवाने तर टोप कासारवाडीसह परीसरात ३ क्रशर व्यवसायाचे परवाने असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे..

error: Content is protected !!