पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
१९६७-६८ या शैक्षणिक वर्षांतील शिरोली हायस्कूल च्या माजी विद्यार्थ्यानी ५७ वर्षांनंतर स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास 50हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हायस्कूलचे मुख्याध्यापक एम.एस.स्वामी होते.यावेळी शाळेच्या प्रार्थनेने स्नेहमेळाव्यास सुरुवात झाली. बी.एस.पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.सौ.भाटवडेकर व व्ही.एस.जोशी या गुरुवर्यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला.यावेळी सन्मानचिन्ह देऊन सर्व विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. कार्यक्रमात जुन्या गाण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना एम.एस. स्वामी यानी समाजात वावरत असताना आपण एक पद धारण करून वाटचाल करत असतो. परंतू एक व्यक्ती म्हणून माझ्या काही भावना आहेत, आपल्या मनातील *स्ट्रेस* बाहेर काढायला आपल्या जवळ outlet नसेल तर मात्र जीवनाचा खरा अर्थ कळलाच नाही अस म्हणावे लागेल.Outlet मिळावा यासाठीच आपण आज एकत्र आला आहात.
आयुष्याचा बराच काळ सरलेला आहे.माणसाने समोर बघायचं की, मागे बघायचं हयावर पुष्कळस सुखदुःख अवलंबून असतं. आपल्या जीवनातून गेलेल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा, आलेल्या गोष्टी स्वीकारत गेलं की, आयुष्य सोपं होत जातं!यावेळी मुख्य संयोजक बी.एस.पाटील यांच्यासह यशवंत मगदूम,अरुण गायकवाड,अरविंद कुरणे,सखाराम पाटील, शालन निकम माजी विद्यार्थी उपस्थित होते. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.