कुरुंदवाड / प्रतिनिधी
शालेय जीवनातील खेळ केवळ शारीरिक विकासासाठी नाही, तर विद्यार्थ्यांना मानसिक दृष्ट्या सुदृढ बनविण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचे ठरतात. खेळांमधून शिकलेली शिस्त, संघर्ष, सहकार्य आणि पराभव स्वीकारण्याची क्षमता विद्यार्थ्यांना आयुष्यातील प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी बळ देते,” असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी केले.तेरवाड (ता.शिरोळ) येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी आश्रमशाळा संस्थापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब सावगावे होते.स्पेअर हेड सेक्युरिटी जयसिंगपूरचे संचालक सूर्यकांत बदामे, लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडचे अध्यक्ष बापूसो पाटील, अनिल दानोळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन माने, योद्धा मार्शल आर्ट अकॅडमिक व शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण केंद्राचे अतुल परीट स्वप्निल लाटे, सुनगारे, मुख्याध्यापक बाबासाहेब तिबिले, संतोष भुयेकर आदी प्रमुख उपस्थित होते.यावेळी बोलताना संचालक बदामे म्हणाले,स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूने या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतल्यावर तो स्वतःला एक नव्या दृष्टीकोनातून पाहण्यास सक्षम होतो. खेळामुळे नवा उत्साह, नवा आत्मविश्वास मिळतो, जो आयुष्याच्या इतर क्षेत्रातही आपल्याला यश प्राप्त करण्यात मदत करतो. प्रत्येक स्पर्धेची सुरुवात एक नवीन ध्येय आणि उद्दीष्ट म्हणून होते, जे आपल्याला कठोर परिश्रम, मेहनत आणि चिकाटी शिकवते.जिल्हाध्यक्ष सावगावे म्हणाले आश्रमशाळा” हे एक व्यासपीठ आहे जे शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये विविध गुणांची वाढ घडवण्यासाठी वचनबद्ध आहे.क्रीडा स्पर्धांद्वारे केवळ शारीरिक क्षमता नाही तर मानसिक शिस्त, टीमवर्क, संघर्षाची तयारी, आणि पराभव स्वीकारण्याची भावना देखील तयार होते. प्रत्येक विद्यार्थी जो आज या स्पर्धेत भाग घेत आहे, तो आजच्या या वादळातील विजेता होईल, कारण त्याने आपल्या सामर्थ्यांची परीक्षा घेतली आहे.यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक तिबिले यांनी केले तर माजी नगराध्यक्ष माधुरी सावगावे, परीट, लाटे,पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली.सुत्रसंचलन संतोष भुयेकर यांनी केले.यावेळी तुकाराम पवार ,रवींद्र केसरकर ,आनंदा शिंदे ,संदीप इंगळे,उमेश माळगे, विनोद चव्हाण, सुनिता शिंदे,सहदेव डंबाळ, शितल घोरपडे, इरगोंडा बंडगर,वैशाली घोरपडे, शैलजा सावगावे, रूपाली सिदनाळे, राहुल पाटील, बी.ए पाटील, वाय एस पाटील, प्राजक्ता चौगुले, भारती जोंग, छाया माने, सुनिता काडापुरे, आकाश बागडी, तेजस सावगावे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
चौकट
संतोष भुयेकर यांचे कौतुकास्पद सूत्रसंचालन
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाचे महत्त्वाचे आकर्षण संतोष भुयेकर होते. त्यांच्या प्रेरणादायक व उत्साही संवादाने कार्यक्रमात ऊर्जा निर्माण झाली. भुयेकर यांच्या शब्दांमुळे क्रीडा महोत्सवात एक उत्साही वातावरण निर्माण झाले, आणि विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. त्यांचे सूत्रसंचालन प्रत्येक वाक्यात ऊर्जा आणि प्रेरणा भरलेले होते, ज्यामुळे कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.