प्रोत्साहनाने आत्मबल वाढते – लेखक मनोहर भोसले

Spread the love

दत्तवाड / प्रतिनिधी

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा व राष्ट्रीय विद्यालय तमदलगे यांच्या वतीने आयोजित ९ वे विद्यार्थी संमेलन विविध साहित्य मेजवानीने व उत्स्फूर्त प्रतिसादाने पार पडले.तमदलगे येथे आयोजित करण्यात आलेल्या ९ व्या विद्यार्थी साहित्य संमेलनामधील घडलेला एक प्रसंग असा होता.इयत्ता ५ वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकांमधील ‘कठीण समय येता ‘ या पाठामधून आपण काय बोध घेतला? असा प्रश्न पाठाचे लेखक मनोहर भोसले यांनी विचारले.या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर कु.शांभवी मुकेश माळी.नवनाथ हायस्कूल पोहाळे,ता.पन्हाळा या विद्यार्थीनीने दिले. लेखकांनी खुश होऊन बक्षिस म्हणून तिला आपला पेन दिला तर तिने नतमस्तक होवून त्याचा स्वीकार केला.दुसऱ्या एका प्रसंगात समडोळी येथील कन्या शाळा क्र.२ची विद्यार्थिनीने संवेदनशील कथा सादर केली.कथा ऐकून सर्व रसिकांच्या मनाचा ठाव घेतल्या.या छोट्या मुलीचे कौतुक करताना लेखकांनी खांदयावर उचलून घेतले.प्रसंग छोटे असतात पण योग्य त्यावेळी त्यांच्या योग्य कृतीला प्रोत्साहन दिले की त्यांचे आत्मबल वाढते असे प्रतिपादन लेखक मनोहर भोसले यांनी केले.यापूर्वीही ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमाने प्रत्यक्षात शाळेत जावून विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमांस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

error: Content is protected !!