कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे
सुजनशक्ती श्रमिक फाउंडेशन कोल्हापूर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई यांच्या संयोगातून चौदावे ग्रामीण किंवा मराठी साहित्य संमेलन मजले येथे जिजाऊ बाल विकास मंदिर येथे होणार आहे. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे त्यामध्ये कुंभोज गावचे सुपुत्र व पत्रकार सचिन भानुसे यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचा सत्कार कुंभोज ग्रामपंचायतच्या सरपंच सौ स्मिता चौगुले उपसरपंच अशोक आरगे सदाशिव महापुरे, दाविद घाटगे, लखन भोसले तसेच सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सदर पुरस्काराचे वितरण 12 जानेवारी रोजी होणार असुन यावेळी आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, अविनाश पाटील डॉक्टर गोमटेश पाटील व डॉक्टर जी पी माळी उपस्थित राहणार आहेत. असल्याची माहिती जिजाऊ बालविकास मंदिर यांनी दिलेल्या पत्रिकेत दिली आहे.