दत्तवाड / प्रतिनिधी
दत्तवाड ता.शिरोळ येथील सत्यसाई सेवा संस्थेमार्फत बांबरवाडी,दत्तवाड शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.आरोग्यविषयक माहिती सांगून स्वच्छतेविषयी प्रबोधन करण्यात आले.त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रोटीन,पेस्ट,टूथब्रश वाटप करण्यात आले.
स्वागत मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे यांनी केले तर आभार अध्यापक निलेश माने यांनी मानले. याप्रसंगी साईराम अशोक कोकणे,प्रकाश माळी,शावगोंडा पाटील यांचेसह विद्यार्थी उपस्थित होते