शिरोळ / प्रतिनिधी
माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील चर्मकार समाज संघटित झाला आहे. शासनाच्या सेवा सुविधा पासून वंचित असणारा हा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. यापुढेही चर्मकार समाजातील गोरगरीब , दुर्लक्षित व उपेक्षित घटकांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहू . आमदार म्हणून निवडून आलो असलो तरी या पदाचा उपयोग समाज हितासाठी राहिल अशी ग्वाही आमदार अशोकराव माने यांनी दिली. दरम्यान , शासनाच्या सहकार्यातून चर्मकार समाजातील युवकांना उद्योजक म्हणून संधी देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.शिरोळ येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ व शिरोळ तालुका चर्मकार समाजाच्या वतीने हातकणंगलेचे नूतन आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने (बापू ) व सौ रेखादेवी अशोकराव माने यांचा सपत्नीक कोल्हापुरी फेटा , शाल – श्रीफळ व मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांचे स्वीय सहाय्यक सुहास राजमाने यांचाही गौरव करण्यात आला.राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरोजताई बिसुरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. डॉ दगडू माने यांनी स्वागत केले.यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड ,राज्य सल्लागार रावसाहेब चव्हाण,राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरोजताई बिसुरे , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील माने यांची भाषणे झाली. आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने हे सुख -दुःख जाणणारे नेतृत्व असून चर्मकार समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले आहे. सामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आमदार अशोकराव माने (बापू ) यांचे कार्य प्रेरणादायी आहे अशा भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या.या कार्यक्रमास राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा महिला अध्यक्षा मनीषा डोईफोडे , जिल्हा शहराध्यक्ष दीपक खांडेकर , ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंदा चव्हाण अजित हंकारे , अनिल लोकरे, चर्मकार महासंघ मंडळाचे संजय खामकर , आरती कमते ,नामदेव पवार , मुरलीधर ठोंबरे , माधवराव गायकवाड ,अर्जुन धुमाळे , रामदास भंडारे , सचिन कमलाकर , पांडूरंग गायकवाड , नारायण आगवाने,रावसाहेब निर्मळे, शितल माने , अरुणताई व्होनमुके ,चैतन्य विजय माने , नागेश शेजाळे , दिलीप कदम ,राजेंद्र प्रधान , विठ्ठल देवकारे , शशिकांत राजमाने , सुभाष माने , रामचंद्र माने , शशिकांत चव्हाण , गजानन माने , संजय माने , लालासाहेब राजमाने, शिवाजी पाटील – कौलवकर , धनंजय टारे ,डॉ नीता माने ,मोहन भंडारे , पी वाय कुंभार , भरत कारवेकर ,संगीता माने , लीलावती देवकारे , विजया दाभाडे , राजश्री चव्हाण , अलका राजमाने ,अनुश्री माने , प्रा तातीयाना माने , हेमलता देवमोरे , पंकज माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र प्रधान यांनी केले. सचिन कमलाकर यांनी आभार मानले.