तमदलगे / प्रतिनिधी
सांगली-कोल्हापूर बायपास महार्गावरील तमदलगे (ता.शिरोळ) येथे झालेल्या अपघातात ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने अतुल बबन माळी वय २९ रा.मालगाव ता.मिरज जि. सांगली) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. घटनास्थळी जयसिंगपूर पोलीसानी धाव घेऊन मृतदेह शिरोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यत जयसिंगपूर पोलिसांत करण्याचे काम सुरू होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मालगाव येथून अतुल माळी हे गाजर विक्री करण्यासाठी कोल्हापूरला गेले होते. रात्री नऊच्या सुमारास माळी हे मिरजकडे परत येत असताना सांगली-कोल्हापूर बायपास महार्गावरील तमदलगे येथील बिरदेव मंदिराच्या चढाजवळ आल्यानंतर झालेल्या अपघातात अतुल माळी यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने ते जागीच झाले. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जयसिंगपूर पोलिसांना कळविले. घटनास्थळी जयसिंगपूर पोलिसानी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शिरोळ ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्री उशिरा मालगाव येथे अपघातात माळी यांचा मृत्यू झाल्याचे समाजाच कुटुंबातील नातेवाईकानी जयसिंगपूर पोलिसांत धाव घेतली.रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम पोलिसांत सुरू होते.