कुंभोज वारणा प्रकल्पात घनकचरा टाकण्यासाठी इंदिरानगर परिसरातील नागरिकांचा विरोध

Spread the love

कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे

कुंभोज तालुका हातकणंगले ग्रामपंचायतच्या वतीने वारणा प्रकल्प येथे टाकण्यात येणारा घनकचरा टाकण्यास वारणा परिसरातील सर्वच नागरिकांनी विरोध केला असून यामध्ये इंदिरानगर ,जयप्रकाश नगर व तसेच माळभाग परिसरातील सर्व नागरिकांनी ग्रामपंचायत मध्ये सरपंच सौ स्मिता चौगुले यांना भेटून घनकचरा टाकण्यास विरोध करत असल्याचे निवेदन देण्यात आले. परिणामी सदर घनकचऱ्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून अनेक नागरिकांना आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. परिणामी सदर घनकचरा टाकत असताना मयत असलेली जनावरे व अन्य कचरा टाकत असल्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरली असून त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास होत आहे. यांच्या विरोधात इंदिरानगर व जयप्रकाश नगर येथील सर्व नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला असून ग्रामपंचायतीला घनकचरा टाकण्यास विरोद्ध दर्शवला आहे. तसे निवेदन ग्रामपंचायत सरपंचांना देण्यात आले यावेळी सरपंच सौ स्मिता चौगुले ,उपसरपंच अशोक आरगे ,ग्रामपंचायत सदस्य दावीद घाटगे, सदाशिव महापुरे, संदेश भोसले, लखन भोसले, राजेंद्र घाटगे ऋषिकेश भोसले ,प्रेमानंद सुवाशे रोहित सुवाशे, विनोद सुवासे यांच्यासह आहेत श्रीधर सुवासे शैलेश आवळे आदि उपस्थित होते.

error: Content is protected !!