आरोग्य विभागामार्फत दत्तवाड परिसरातील शाळांत काविळ रोगासंबंधी जनजागृती मोहिम

Spread the love

दत्तवाड / प्रतिनिधी

विद्या मंदिर बांबरवाडी,दत्तवाड येथे आरोग्य विभागामार्फत आरोग्यसेविका एफ.ए.सनदी व आरोग्य सेवक आर.एस.राजमाने यांनी शालेय विद्यार्थ्यांमध्ये काविळ रोगासंबंधी जनजागृती केली.स्वच्छतेचे संदेश,पिण्याच्या पाण्याबाबत घ्यावयाची काळजी, उघडयावरचे अन्नपदार्थ खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम, कावीळची लक्षणे व त्यावरील उपाय यासंबंधी माहिती दिली.विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन आरोग्य सेविका सनदी यांनी केले. मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे यांनी स्वागत केले तर अध्यापक निलेश माने यांनी आभार मानले.वैद्यकीय अधिकारी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय स्टाफनी घोसरवाड,दत्तवाड गावातील सर्व शाळांमध्ये ही मोहिम राबविण्यात आली.

error: Content is protected !!