हातकणंगले व इचलकरंजी नूतन आमदारांचा गौरव सोहळा संपन्न

Spread the love

कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे

इचलकरंजीतील लायन्स ब्लड बँक, दाते मळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. उच्च तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री मा.आमदार प्रकाश आवाडे आणि प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाने हा सोहळा यशस्वीपणे पार पडला.
आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांचा सत्कार या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरला.त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

 

 

 

 

यावेळी आमदार अशोकराव माने, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, इचलकरंजी भाजपा अध्यक्ष पै. अमृतमामा भोसले, तसेच भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

हा सत्कार सोहळा विकासाच्या नव्या वाटचालीचे प्रतीक ठरला असून, जनतेच्या विश्वासावर उभारलेल्या नेतृत्वाने महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्याचा दृढनिश्चय अधोरेखित केला.

error: Content is protected !!