हातकणंगले / प्रतिनिधी
राजगुरुनगर मधील गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्यांचा निरघृणपणे खून करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करावी, खरा आरोपी शोधून काढावा यासह विविध मागण्यासाठी अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघाच्या वतीने आज हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चाला हातकणंगले पंचायत समिती कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली.मोर्चा मुख्य रस्त्याने तहसीलदार कार्यालयावर आला.यावेळी या घटनेतील मूळ आरोपी शोधून त्याच्यावर कारवाई व्हावी,या घटनेची सीआयडी चौकशी करावी,अत्याचार ग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी,या प्रकरणात सरकारी वकील म्हणून एडवोकेट उज्वल निकम यांची नेमणूक करावी यासह विविध मागण्यां करण्यात आल्या. यावेळी बोलताना आमदार अशोकराव माने म्हणाले गोसावी समाज हा प्रामाणिक आणि गरीब असून राजगुरू मधील झालेली घटना निश्चितच निषेधार्थ आहे.याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सीआयडी चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले,
नगरसेवक राजू इंगवले,जयराज घाडगे, संजय मकवाने,आकाश गोसावी,कुमार गोसावी, संदीप गोसावी यांच्यासह महिला आणि विद्यार्थिनीनी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना देण्यात आले.याप्रसंगी कुमार जाधव,वसंत जाधव,युवराज जाधव,अजित गोसावी,संभाजी गोसावी,लखन गोसावी,मारुती गोसावी यांच्यासह गोसावी समाजाच्या महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.