पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवासाठी मुख्यमंत्री फडणवीस ६ जानेवारीला नांदणीत

Spread the love
नांदणी / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील अतिशय क्षेत्र नांदणी येथे सुरु असलेल्या पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवासाठी सोमवार 6 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेट व दर्शनासाठी येत आहेत. यावेळी आचार्य विशुध्द सागर महाराज, 10 आचार्य महाराज, 7  मुनी महाराज, 25 आर्यिका माता आदींसह विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली.
ते म्हणाले, शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील 743 गावांचे अधिपत्य असलेल्या स्वस्तिश्री जिनसेन मठ याठिकाणी प्रत्येक 12 वर्षानंतर महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदा 1 ते 9 जानेवारी या कालावधीत नांदणी येथे पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामहोत्सवासाठी उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी आमंत्रण दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारत्मकता दर्शविली होती.
पंचकल्याणक महोत्सव कमिटीचे कार्याध्यक्ष सागर शंभूशेटे यांनी, हा महोत्सव नांदणीच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या महोत्सवात शंभरपेक्षा अधिक साधु-संतांचे एकाचवेळी दर्शन घडत आहे. तर दररोज लाखापेक्षा अधिक श्रावक-श्राविका महोत्सवात सहभागी होत असल्याचे सांगितले. सोमवारी मुख्यमंत्री यांच्यासोबतच स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महाराज, उच्चतंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, नामदार हसन मुश्रीफ, नामदार प्रकाश आबिटकर, आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अशोकराव माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडेआदींसह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
error: Content is protected !!