शिरोळ / प्रतिनिधी
हेरवाड ता शिरोळ येथील ज्येष्ठ महिला श्रीमती चिंगुबाई बापू माने (वय वर्षे ९१) यांना प्रहार न्यूज मीडिया व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आदर्शमाता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .इचलकरंजी येथे झालेल्या शिव -भिम महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रमुख विकास गायकवाड यांनी स्वागत केले. सुनील शिंदे यांनी प्रास्ताविक भाषणात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी जागतिक गिर्यारोहक अन्वी अनिता चेतन घाटगे, अभिनेता डॉ दगडू माने , पोलीस मित्र महिला आघाडीच्या राज्य सचिव रजनीताई शिंदे , एकपात्री नाट्य कलाकार राजेंद्र प्रधान,अण्णासाहेब कदम, नारायण हुपरीकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील व्यक्तींना शिव -भिम पुरस्काराने गौरविण्यात आले.
समाजाभिमुख काम करताना दुर्लक्षित व उपेक्षित घटकांना मदत करून मानवतेचा धर्म जोपासला पाहिजे. ज्येष्ठांचा आदर करून महिला सक्षमीकरण, युवकांना दिशा आणि उपेक्षितांना आधार देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे अनेक मान्यवरांनी सांगितले.
यावेळी कलाकार राजेंद्र प्रधान, प्रा तातीयाना माने , रावसाहेब माने , विलास माने , दिनकर माने , सुभाष माने, शैलेंद्र गावडे , अनिता घाटगे , एस एस चाचर , सौ संगीता माने , भारती शिंदे , शानाबाई माने, विनोद माने यांच्यासह हेमंत जावीर, सागर लोंढे, सखाराम पांढरबळे, नितीन दबडे, महेश मोहिते, नागराज हजारे, दादासो सुतार, मार्तंड कांबळे, नजीर नदाफ, उमेश जाधव, राजू पाळेकर, आकाराम पांढरबळे,शशिकांत परीट,तानाजी कांबळे, संध्या गावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.